Marathi Prem Kavita Romantic Poems

Marathi Prem Kavita Romantic Poems 

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले,
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रू बरसले
तिचीच आस धरून, आयुष्यात मी बीखरलो
नसताना ती जवळ, जगणेही मी विसरलो
तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून या, आभाळा सारख्या बरसल्या
खूप काही म्हणायचं होत,शब्द माझे आतुरलेले
मुखातून उमलता, डोळ्यातून उमळलेले
म्हटलं जरा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणी संगे जगतो, तिलाही थोड कळाव
तिच्या आठवणींची ओंजळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण सांडवता जीवापाड मी जपलेली
कंठ आज दाटून आला तिला समोर पाहून
बरच काही बोलायचं होत मनात गेले शब्द राहून
इतक्यात तिने पाहिले मला,डोळ्यात अश्रू ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली,मलाही कळत
नव्हती ती आज माझी,झाली दुसऱ्या कोणाची
रेशमगाठी तुटल्या आमच्या, सदैव राहिली या वेड्या मनाची 
 

Most Reading