Marathi Kavita Sandeep Khare

Marathi Kavita Sandeep Khare

दोघें ही एकमेकांवर प्रेम करायची
जागेपणी ही प्रेमाची स्वप्न बघायची 

ही रोमिंग मध्ये असूनही ह्याला CALL करायची
ह्याच आवाज ऐकला नाही, तर चीडचीड करायची 

तिचा फोन आला तर, हा ही खुश व्हायचा
कामामध्ये वेळ काढून, तिच्याशी बोलायचा

बघता बघता ह्यांच्या प्रेमाला खुपच बहार आला
का बरं कुणास ठाऊक? तो तिला सोडून गेला.

ह्याच्यावर खूप मुली प्रेम करायच्या
ह्याच्यासाठी काहीही करायला तयार व्हायच्या 

हा मात्र दुर्लक्ष करून तिलाच भाव द्यायचा
बाकीच्या मुली काय काय करतात, तो फक्त हिलाच सांगायचा 

बाकीच्या मुलींचे नावं काढताच, हिला मात्र खूप राग यायचा
रडून रडून हिला त्याचा, मानसिक त्रास व्हायचा 

नाजूक अशा प्रेमाचा, अचानक प्रेम भंग झाला
का बरं कुणास ठाऊक? तो तिला सोडून गेला

 

Most Reading