Marathi Kavita on Life

Marathi Kavita on Life 

  जाता जाता आठवण म्हणून
डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास
माझ्या मनाला माझ्यापासून
परकं करून गेलास

रुसले हे मन माझे
माझ्याशी आज बोलत नाही
तू न माझा राहिलास
हे त्या वेड्याला पटत नाही

कितीही समजावले तरी
माझे तो मानतच नाही
तुझ्याच विचारात राहतो
माझे दुख: त्याला कळतच नाही

वेडं हे मन माझे
तुझी वाट पाहणं सोडत नाही
तू परत कधीच येणार नाही
कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही


Horse Dance

 

Most Reading